बोदवड :- बोदवड तहसील कार्यालयातील पुरवठा लिपीक उमेश बळीराम दाते वय 55 यास आज पाच वाजे सुमारास 1000 रूपये लाच घेण्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले याबाबत अधिक माहिती अशी की नांदगाव येथील तक्रारदार यांनी रेशनकार्ड वरील आईचे व मुलाचे नाव कमी करून नवीन रेशनकार्ड करण्यासाठी अर्ज दिला होता या कामासाठी तक्रारदार यांचेकडे 1000 रूपये लाचेची मागणी केली होती तक्रारदार याचे तक्रारी नुसार आज सापळा रचून ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी सापळा लावने तपास अधिकारी अमोल वालझाडे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांनी पथकातील सहाय्यक फौजदारी दिनेशसिग पाटील राकेश दुसाने बाळू मराठे कारवाई मदत पथकात
स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर,पो. का सचिन चाटे हे कर्मचारी होती