रिपाइं (आ)चे जिल्हाधिकार्यांना निवेदन
जळगाव – झोपडपट्टी भागातील वंचित लाभार्थ्यांना मॅन्युअली पध्दतीने धान्याचा पुरवठा करावा अशी मगाणी रिपाइं (आ) तर्फे जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रिपाइंतर्फे जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने राज्यात इ-पॉसद्वारेच धान्य वाटपाचे आदेश दिले आहेत. झोपडपट्टी भागातील लाभार्थी हे गवंडी काम, विट भट्टी काम, महिला धुणी,भांडी करीत असल्याने त्यांच्या हाताचे ठसे इ-पॉस मशिनवर येत नसल्याने त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला आहे. तसेच रमजानचाही महिना सुरू आहे. शासनाने माणुसकीच्या दृष्टीकोनातुन १५ ते २० टक्के लाभार्थ्यांना मॅन्युअली पध्दतीने धान्य स्वस्त धान्य दुकानातुन उपलब्ध करून गोर गरीब लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी रिपाइं (आ)चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, जिल्हा सचिव भरत मोरे, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, हरीष शिंदे, आनंद गायकवाड, प्रशांत गायकवाड, भिमराव बनसोडे, पृथ्वी गायकवाड, सरताज पठाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.