चेन्नई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच आयपीएलमधील चेन्नई संघाचे कर्णधार महेंद्र सिंह धोनीला क्रिकेटमधील देवच मानले जाते. देशातच नव्हे तर देशाबाहेरही धोनीचे अनेक फँन्स, फोलोअर्स आहेत. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला होता. धोनी कायमच खेळत राहावा अशी फँन्सची इच्छा आहे. धोनीसाठी फँन्स काहीही करायला तयार असतात, असाच एक धोनीचा प्रचंड वेड असल्याच्या फँन्सची कहाणी समोर आली आहे. एएनआयने त्याचे काही फोटो पोस्ट केले आहे.
धोनीसाठी आणि चेन्नई संघासाठी या फँन्सने चक्क घरालाच धोनीचे नाव दिले आहे. एवढेच नाही तर घराच्या भिंतीवर धोनीचे चित्र रेखाटले आहे. संपूर्ण घराला पिवळा (चेन्नई संघाचा)रंग दिला आहे. तामिळनाडू राज्यातील अरांगुर गावातील गोपी कृष्णन असे धोनीचा वेड असलेला तरुणाचे नाव आहे. ‘मी धोनीचा मोठा फँन्स आहे. सध्या अनेक लोक धोनीबद्दल नकारात्मक टिप्पणी करतात, मात्र धोनी हा मोठा खेळाडू आहे हे ते विसरतात असे’ गोपी कृष्णन म्हणतो.
सध्या धोनीच्या कामगिरीमुळे त्याच्यावर टीकाही होऊ लागली आहे. मात्र दुसरीकडे धोनीचा मोठा चाहता वर्ग आहे, जो कायम धोनीला पाठींबा देत असतो. धोनी आजही विरोधी संघातील खेळाडूंना देखील मार्गदर्शन करत असतो. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमधील काही फोटो समोर आले आहेत, ज्यात धोनी विरोधी संघातील खेळाडूंना खेळाविषयी मार्गदर्शन करत आहे.