तेज बहादूर निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीमधून निवडणूक लढविणारे माजी बीएसएफचे जवान तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द झाल्याने त्यांनी आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. तेज बहादूर समाजवादी पक्षाच्या तिकिटावर वाराणसीतून निवडणूक लढणार होते. प्रसिद्ध कायदेतज्ञ प्रशांत भूषण हे तेज बहादूर यांच्या बाजूने केस लढणार आहे.

सैन्यात असतांना सैन्य दलाच्या जवानांना दिले जाणारे जेवण निकृष्ठ दर्जाचे असल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. तेंव्हापासून ते चर्चेत आहेत.