कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारला नोटीस !

0

नवी दिल्ली: कलम ३७० रद्द करण्यासंदर्भातील याचिकांवर दाखल याचिकांवर आज बुधवारी २८ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठ याचिकांवर सुनावणी करणार आहे. न्यायालयाने केंद्र आणि जम्मू काश्मीर सरकारला याप्रकरणी नोटीस जारी केली आहे. याचिकाकर्त्यांमध्ये जामिया येथील विद्यार्थ्यांसोबत सीपीआय नेता सीताराम येचुरी यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना काश्मीरला जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र यावेळी भेटीगाठी करण्याशिवाय इतर कोणतीही हालचाल केली जाऊ नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.