सर्वोच्च न्यायालय परिसरात कलम १४४ लागू

0

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपाची तपासणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने केलेल्या तपासणीच्या पद्धतीविरोधात वकील आणि महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आता न्यायालय परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सरन्यायाधीश गोगोई यांच्यावर एका माजी महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्याचा तपास करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. काल या समितीने सरन्यायाधीश गोगोई यांना क्लीनचीट देत आरोपातून मुक्तता केली.

आज सकाळपासून सर्वोच्च न्यायालय परिसरात या निर्णयाविरोधात आंदोलन सुरु होते. पोलिसांनी गर्दी हटविण्यासाठी प्रयत्न केले मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अखेर कलम १४४ लागू करण्यात आले. यावेळी पोलिसांनी काही पत्रकारांना ताब्यात घेतले आहे.