नवी दिल्ली: आयएनएक्स मीडियाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते सीबीआयची कोठडीत आहे. दरम्यान आता सुप्रीम कोर्टाने त्यांना जामिनासाठी ट्रायल कोर्टात अर्ज करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता चिदंबरम जामिनासाठी अर्ज करू शकतात. आज गुरुवारपर्यंत चिदंबरम सीबीआय कोठडी आहे. आज त्यांची कोठडी समाप्त होणार आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयने त्यांना तिहार तुरुंगात पाठविण्याबाबत सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली होती, यावर कोर्टाने त्यांना कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले होते.