माझा राजकीय भाव वाढला

0

मुंबई-राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. लाड यांची क्रिस्टल कंपनी वादात आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत ‘मानव तस्करी करुनही फक्त भाजपात आहेत म्हणून प्रसाद लाड पावन झाले का?’ असा प्रश्न उपस्थित केला. याला आमदार लाड यांनी उत्तर दिले आहे. खासदार सुप्रिया ताईंनी केलेल्या ट्वीटबद्दल मला अतिशय दुःख झालं. मी राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हापासून बिझनेसमध्ये आहे. जेव्हा मी त्यांच्या पक्षात होतो तेव्हा हाच व्यवसाय करत होतो. त्यामुळे ताईंनी माझ्यावर टीका करण्याआधी त्याची शहानिशा करणं अपेक्षित होतं. त्यांनी संबंधितांकडून नीट माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. ताईंनी ट्विट केल्यामुळे माझा राजकीय भाव वाढला. राष्ट्रवादीने माझा धसका घेतला आहे.