भाजपकडून वर्षपूर्तीनिमित्त इंधनदरवाढीची भेट-सुप्रिया सुळे

0

मुंबई-पेट्रोल- डिझेल दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सरकारला चार वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी जनतेला इंधनदरवाढीची भेट दिली. आता जनता लवकरच मतपेटीतून सरकारला रिटर्न गिफ्ट देऊन हिशोब चुकता करेल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

ट्वीटर वरून आरोप 

इंधनदरवाढीचा भडका वाढू लागल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या दरामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर भडकले असून दरनियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे केंद्रीय मंत्र्यांकडून सांगितले जात आहे. तर विरोधी पक्षांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन मोदी सरकारवर टीका केली.

दरम्यान, शुक्रवारी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तीन वर्षे अभ्यास करुनही राज्यातील प्रश्न सुटत नसून मुख्यमंत्र्यांना चांगले सरकार चालवण्यासाठी ट्यूशन लावण्याची गरज आहे. राज्यात अजित पवार यांच्याइतकी चांगली ट्यूशन कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावावी, त्यांची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, असे सुळे यांनी इंदापूरमधील सभेत म्हटले होते.