कर्ज काढून व्यवसाय सुरु करणाऱ्या व्यापाऱ्याने दिवाळीला कर्मचाऱ्यांना दिली चारचाकी भेट

0

सुरत- गुजरातमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हरि कृष्णा एक्सपोर्ट्सचे चेअरमन असलेले ढोलकिया या दिवाळीला आपल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीला खास भेट वस्तू देत असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सावजी ढोलकिया यांनी आपल्या ६०० कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त चारचाकी कार भेट म्हणून दिली आहे. ९०० कर्मचाऱ्यांना बँकेत एफडी दिली आहे.

या व्यापाराने एकेकाळी कर्ज घेऊन कंपनी सुरु केली होती. आज व्यवसायात मोठ्या प्रमाणात नफा कमवीत आहे. केवळ कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर आपण व्यवसायात यशस्वी झालो असल्याच्या भावनेने ते दरवर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना खास भेट वस्तू देत असतात.