ट्वीटर वरून सुषमा स्वराज यांनी एका तरुणाची केली अशी मदत

0

नवी दिल्ली- ट्विटरवर शेख अतीक नावाच्या एका युजरने सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली. ट्विटमध्ये त्याने , सुषमा जी मला तुमच्या मदतीची गरज आहे. मला भारतात माझ्या घरी परतायचे आहे , पण माझा पासपोर्ट खराब झाला आहे. मी विद्यार्थी असल्याने जास्त खर्च करु शकत नाही तसेच माझी प्रकृतीही ठिक नाही. तुम्ही माझी मदत करा अशी विनंती त्याने केली.

त्याच्या ट्विटला उत्तर देताना सुषमा यांनी ट्विट केले , जर तुम्ही जम्मू-काश्मीरचे असते तर मी नक्कीच तुमची मदत केली असती. मात्र तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्ही भारतव्याप्त काश्मीरमध्ये राहतात. परंतु भारतव्याप्त काश्मीर अशी कोणतेही ठिकाण नाही असे उत्तर स्वराज यांनी दिले.

स्वराज यांच्याकडून आलेल्या उत्तरानंतर मदत मागणा-या विद्यार्थ्याने तातडीने स्वतःची प्रोफाईल बदलली आणि भारतव्याप्त काश्मिरऐवजी जम्मू-काश्मिर असे केले. त्यानंतर स्वराज यांनी त्याच्या मदतीसाठी निर्देश दिले.