मुंबई: बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु आहे. सीबीआयसोबतच ड्रगच्या अँगलने देखील तपास सुरु आहे. नार्कोटिक्सच्या पथकाकडून अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीसह सॅम्युअल मिरांडा याला काल अटक करण्यात आली होती. दरम्यान आज अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून रियाला अटक होणार का?याकडे लक्ष लागले आहे.
अभिनेता सुशांतसिंह ड्रगच्या आहारी गेला होता, त्याला रिया जबाबदार असल्याचे आरोप होत आहे. त्यानंतर एनसीबीने ड्रग माफियांचे धागेदोरे तपासले, त्यातून सॅम्युअल मिरांडाची चौकशी झाली, त्यानंतर रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीचीही चौकशी झाली. त्यांना अटक करण्यात आली आहे. आज ५ रोजी त्यांना कोर्टात देखील हजर करण्या आले.