नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप त्यांचा राजीनाम पक्षाने स्वीकारला नसला तरी ते राजीनामा मागे न घेण्यावर ठाम आहे. नवा अध्यक्ष पक्षानेच निवडावा, असे देखील राहुल गांधी यांनी पक्षाला सुचविले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा शोध सुरू झाला आहे. दरम्यान ज्येष्ठ काँग्रेसनेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मध्यंतरी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा अध्यक्षपदासाठी होती. मात्र आता सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.
संडे गार्जियनच्या वृत्तानुसार, गांधी कुटुंबीयांकडून काँग्रेस अध्यक्ष पदासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, या नावाला जाहीर करण्यासाठी अद्याप काहीसा विलंब लागण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्विकारत जवळपास 140 नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे राजीनामा नाट्य संपल्यानंतरच ही घोषणा होईल, असे बोलले जात आहे.