Suspects In Police Net With Gavathi Kattya in Yawal यावल : यावल पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टा बाळगणार्या संशयीताच्या मुसक्या बांधल्या तर आरोपीचा साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. अटकेतील आरोपीकडून गावठी कट्टा व मॅग्झीन तसेच दुचाकी जप्त करण्यात आली. यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळील मोर नदीजवळ ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आली. विष्णू कुमार पुखराज रेनवा (33, रा.सतावाडीया, ता.मसुदा, राजस्थान) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल तालुक्यातील अंजाळे जवळील मोर नदीच्या पुलावर दोघांजवळ गावठी कट्टा असल्याची माहिती निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई आदेश दिले. पथकाने धाव घेतल्यानंतर संशयीत विष्णू कुमार पुखराज रेनवा (33, रा.सतावाडीया, ता.मसुदा, राजस्थान) हा व आकाश (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने रेनवा यास ताब्यात घेण्यात यश आले मात्र आकाश हा पसार होण्यात यशस्वी झाला. रेनवा याच्या अंगझडतीत गावठी कट्टा व मॅग्झीन आढळल्याने ते जप्त करण्यात आले तसेच आरोपींची दुचाकी जप्त करण्यात आली. पोलीस हवालदार सुशील घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.