तपत कठोरा येथे एकाचा संशयास्पद मृत्यू

वरणगांव । प्रतिनिधी

तपत कठोरा खु।। . येथे एकाचा रात्री संशयास्पदरित्या मृत्यु झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. तर याबाबतीत गावातील काही नागरीकांना चौकशी कामी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.

तपत कठोरा खु॥ येथील कृणाल सुदाम पाटील ( वय – ३७ ) हा दि.२० जुन रोजी सांयकाळी घरातून निघून गेला होता. मात्र, २१ जून रोजी सकाळी त्याचा मृतदेह गावातीलच बाळु निवृत्ती बेंडाळे यांच्या घरालगतच्या मोकळ्या जागेत आढळुन आला. यामुळे मयताचा चुलत भाऊ चंद्रकांत प्रल्हाद पाटील याने वरणगांव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पीएसआय शेख तपास करीत आहेत. तर मयताचा मृत्यु रासायनिक गावठी दारू प्राशन केल्याने झाल्याच्या आरोपावरून गावातील काही नागरीकांना चौकशी कामी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते .