कुऱ्हा येथील स्व अशोक फडके माध्यमिक विद्यालय दहावी निकालात मुलीचं सरस
स्व अशोक फडके विद्यालयाचा निकाल ९५.८० टक्के निकाल
कु.दीक्षा जगदेव इंगळे ही विद्यार्थिनी कुऱ्हा केंद्रातून प्रथम
मुक्ताईनगर प्रतिनिधी l
आज राज्यभरातील दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने सर्वत्र जाहीर झाल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .त्यातच कुऱ्हा येथील स्व.अशोक फडके माध्यमिक विद्यालय निकाल ९५.८० टक्के तर शिवाजी हायस्कुल कुऱ्हा ८९.३७ टक्के ,शिवाजी हायस्कुल वढोदा ७३.४३ टक्के , आश्रम शाळा जोंधनखेडा ७७.१४ टक्के, शिवाजी हायस्कुल पारंबी ८८.६३ टक्के , न्यानपूर्णा विद्यालय ८८.४५ टक्के, तर आश्रम शाळा चारठणा ८४.६१टक्के निकाल लागला आहे .
स्व .अशोक फडके विध्यालायातील कु.दीक्षा जगदेव इंगळे ९४.४० टक्के ही विद्यार्थिनी सातही शाळेचे परीक्षा केंद्र कुऱ्हा असलेल्या कुऱ्हा केंद्रातून प्रथम आली आहे
दुसरी कु.अंजली अंबादास आंबेकर ९०.४० टक्के ,
तर
तिसरी कु.युक्ता गिरधर सोनवणे ८९.६० टक्के
असा निकाल जाहीर झाला असून बारवी प्रमाणे दाहवीतही मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्या तिन्ही विद्यार्थिनींचे व शाळेतील सर्व विद्यार्थांचे शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक यांनी सर्वांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या