स्वदेशी अग्नी ५ चे प्रक्षेपण यशस्वी

0

नवी दिल्ली-ओदिशातील बालासोर येथून स्वदेशी क्षेपणास्त्र अग्नि ५ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. लांब पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रावरून अणवस्त्रे वाहून नेता येऊ शकतात. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५ हजार किमी इतकी असून ते डॉ. अब्दुल कलाम बेटावरून लाँच करण्यात आले. हे आतापर्यंतचे सर्वाधिक आधुनिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवरून मारा करू शकते. संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत असलेल्या कलाम बेटाच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या पॅड ४ वरून आज सकाळी ९.४८ वाजता हे क्षेपणास्त्र लाँच करण्यात आले. अग्नि ५ ची ही सहावी चाचणी ठरली. चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राने अपेक्षित अंतर गाठले.

अग्नि ५ च्या तुलनेत सर्वाधिक आधुनिक आहे. हे नेव्हिगेशन आणि दिशा दर्शक, वॉरहेड आणि इंजिनसंबंधी नवीन तंत्रज्ञानांनी युक्त आहे. हायस्पीड कॉम्प्युटर आणि कोणतीही कमतरता सहन करण्याची क्षमता असलेले सॉफ्टवेअरबरोबर रोबस्टच्या साहाय्याने क्षेपणास्त्राचे यशस्वी लाँचिंग होण्यास मदत झाली.

पृथ्वी वायुमंडळात येताना क्षेपणास्त्राला भिडणाऱ्याला हवेमुळे याचे तापमान ४००० डिग्री सेल्सियसपर्यंत वाढते. यासाठी यात कार्बन कंपोजिट शील्ड लावण्यात आली आहे. त्यामुळे आतील तापमान ५० डिग्रीपेक्षा कमी राहते. अग्नि ५ ची पहिली चाचणी १९ एप्रिल २०१२, दुसरी १५ सप्टेंबर २०१३, तिसरी ३१ जानेवारी २०१५ आणि चौथी चाचणी २६ डिसेंबर २०१६ रोजी झाले. पाचवे परीक्षण १८ जानेवारी २०१८ला झाले होते. या सर्व पाच चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या.