‘स्वच्छ भारत’ इंटर्नशिपची घोषणा

0

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘स्वच्छ भारत’ इंटर्नशिपची घोषणा केली आहे. ‘मन की बात’ ह्या रेडिओवरील कार्यक्रमातून मोदींनी ही घोषणा केली आहे. देशभरातील तरुणांनी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ‘स्वच्छ भारत इंटर्नशिप’ या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. क्रीडा, मानव संसाधन विकास आणि जल मंत्रालयाच्यादेशातील तीन मंत्रालयातंर्गत स्वच्छ भारत इंटर्नशिपची घोषणा करण्यात आली आहे.

महाविद्यालयीन तरुण, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र संघटनेतील स्वयंसेवक तसेच समाजासोबतच देशासाठी काहीतरी करु पाहणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. २ ऑक्टोंबर २०१४ ला महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. रस्ते, लहान गावांमधील पायाभूत सुविधा, शहरे व ग्रामीण भागात स्वच्छता करण्यासह त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशातून ह्या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे.