जळगाव – झोमॅटो नंतर आता जळगावच्या मार्केटमध्ये स्विगीने प्रवेश केला आहे. आजपासून जळगावात स्विगीने आपली सर्व्हिस सुरु केली आहे.
अल्पावधीतच जळगावात लोकांनी झोमॅटोला जोरदार प्रतिसाद दिला होता. गेल्या काही आठवड्यांपासून स्विगी सुरु होणार असल्याची चर्चा सुरु होती. आता हे दोन मोठे प्रतिस्पर्धी आल्याने चांगलीच स्पर्धा निर्माण होऊन खवय्यांना विशेष डिस्काऊंटचा फायदा मिळणार आहे. सध्या झोमॅटो आणि स्विगीवरील अनेक हॉटेल्सवर ४०% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे.भविष्यात तो अजून वाढण्याची शक्यता आहे.
जळगावकरांना घरपोच फूड डिलिव्हरीची ओळख करून देणाऱ्या स्थानिक बॅग ऑन व्हील आणि फुडीझ या कंपन्या आता कितपत तग धरू शकता हे पाहण्यासारखे असेल.