नवी दिल्ली-काळा पैसा जमा करण्यात स्वित्झर्लंड देश संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भारतातीलही काही काळा पैसा हा स्वित्झर्लंडच्या बँकेत जमा केला जात असल्याचे बोलले जाते. मात्र काही स्वित्झर्लंडमधील नकली काळा पैसा बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. २०१७ ची ताजी आकडेवारी समोर आली आहे. त्यात २०१७ या वर्षात स्वित्झर्लंडमध्ये भारतीय नकली चलन केवळ तीनच आढळले आहे. वर्षभरात केवळ तीनच भारतीय नकली चलन जप्त करण्यात आले आहे. तर सर्वाधिक नकली चलन ‘युरो’ जप्त करण्यात आले आहे. भारतीय चलनातील २ हजार रुपयाची एकही चलन जप्त करण्यात आलेले नाही. फेडपोलच्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये १०० रुपयाचे एक आणि ५०० रुपयाचे दोन असे तीन भारतीय नकली चलन स्विस पोलिसांनी जप्त केले आहे