शहादा:-
येथील डोंगरगाव रस्ता, दोंडाईचा रस्ता, स्वामी विवेकानंद बस थांबा जवळील (प्रकाशा रस्ता) परिसराच्या लगतच्या महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या कालवे/ पाटचारींवर व्यवसाईक बांधकाम करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई होणेबाबत पाटबंधारे उपविभाग शहादा शाखा येथे मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर समुद्रे यांनी निवेदन दिले.
निवेदनाचा विषय असा की, डोंगरगाव रस्ता, दोंडाईचा रस्ता, स्वामी विवेकानंद बस थांबा जवळील (प्रकाशा रस्ता) परिसराच्या लगतच्या महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेले कालवे / पाटचारींवर पेवर ब्लॉक बांधकाम. पाईप टाकून प्रवाह बदलण्याचे प्रकार, पाटचारी लगतच्या काही व्यवसायिकांनी पाटचारीवर व्यवसायिक स्वार्थ साधत पाटचारी बुजून जागा ताब्यात घेत शासनास आव्हान देणाचे प्रकार सुरुकेले आहे. असे असतांना आपल्या विभागाचे मात्र यावर दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
वास्तविक पाहता कालवा/ पाटचारी लगतच्या परिसरातील रहिवाशांच्या वाजवी सोयी साठी समुचित प्राधिकरणास आवश्यक वाटेल अशा ठिकाणी कालवा/ पाट ओलांडण्यास साधनांची सोय करण्यात येत असते, म्हणचे रहिवाशांच्या गरजेप्रमाणे ये-जा करण्यासाठी, परंतु पाट ओलांडण्यासाठी शहादा नगर पालिकेचे व इतर मुख्य रस्ते अस्तित्वात असतांना पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यालगत पाटवर अनेक व्यावसायिकांनी पाईप टाकन्याच्या नावाखाली पाट बुजण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी पेवर ब्लॉक टाकून पाटचारी लुप्त केल्याचे दिसत आहे. ह्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहास देखील बाधा होत असल्याने पाटच्या परिसरातील रहिवासी वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरत असते. म्हणूनच पावसाळ्यापूर्वी पाटचारीवर असलेले व्यवसायिक बांधकाम काढण्यात यावे व पाटचारी, कालवा नैसर्गिकरित्या प्रवाहित होवू द्यावा अशी मागणी आम्ही करीत आहोत. तरी आपण याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देवून संबधितांवर कार्यवाही करावी. अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येण्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला.
निवेदनावर मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे, जिल्हा सचिव योगेश सोनार, जिल्हा उपाध्यक्ष भारत खैरनार, तालुका सचिव अमेय राजहंस, शहादा शहर अध्यक्ष सुहास (दादू) पाटील, शहर सचिव रविकांत संजराय आदींच्या साह्य आहेत.