किनगाव येथे इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुलच्या तालुकास्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धा सपन्न

यावल (प्रतिनीधी ) तालुक्यातील

किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुल येथे यावल तालुकास्तरीय शासकीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुलचे सचिव व बालाजी डेव्हलपर्सचे संचालक मनीष विजयकुमार पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रिडाअधिकारी सौ.सुजाता घुलाने हाँलीबाँल प्रशिक्षक राजेंद्र चौधरी डांभुर्णी केंन्द्राच्या केंन्द्र प्रमुख सौ.कविता गोइल डी.एस.ओ.आँफीस कर्मचारी विनोद कुलकर्णी हे उपस्थीत होते या कार्येक्रमाच्या सुरूवातीला विद्येचे दैवत माता सरस्वती व शक्तीचे देवता महाबली विरहनुमान यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पुजन करत दिप प्रज्वलन करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्कूलचे सचिव मनीष पाटील व मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी शाळेच्या वतीने मंचावर उपस्थीत मान्यवरांचा व सर्व क्रिडा शिक्षकांचा शाल व श्रीफळ देत सत्कार केला तर मनीष पाटील,कविता गोयल व सुजाता घुलाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत खेळाचे महत्व पटवून दिले या ठिकाणी विविध स्पर्धा घेण्यात आल्या यात १००,२०० व ४०० मीटर धावणे,गोळाफेक,थाळी फेक इ.सह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुल किनगाव व तालुका क्रीडा अधिकारी यांनी केले होते.या सर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे क्रिडा शिक्षक दिलीप बिहारी संगेले,प्रतिक मुकुंद तायडे शिक्षक हर्षल मोरे,योगीता बिहारी,देवयानी साळुंखे,मिलींद भालेराव,भावना चोपडे,प्रतिभा धनगर,गोपाल चित्ते,पवनकुमार महाजन,सुहास भालेराव,पुजा तायडे,सोनाली कासार, प्रतिभा पाटील,बळीराम कोतवाय,शेखर पाटील,वैशाली चौधरी,योगीता सावडे, रोहित बावीस्कर,मयुरी बारी, तिलोत्तमा महाजन,सोनाली वाणी, रत्ना बाविस्कर,वैशाली बडगुजर, बाळासाहेब पाटील इ.सह शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.