चेन्नई-तामिळनाडूची राजधानी चेन्नईत आज अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएमएमके) या पक्षाचे प्रमुख टीटीवी दिनकरन यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. दिनकरन कारमध्ये नसल्याने या जीवघेण्या हल्ल्यातून ते बचावले आहेत, मात्र त्यांचा चालक आणि एक छायाचित्रकार यात जखमी झाले आहे.
काही महिन्यांपूर्वीच दिनकरन यांनी अण्णा द्रमुक पक्षाशी फारकत घेत आपला अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएमएमके) हा पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापनेदिवशी दिनकरन यांनी अण्णा द्रमुकच्या प्रमुख दिवंगत जयललीता यांची आठवण काढली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या झेंड्यावरही जयललीता यांची प्रतिमा लावली होती. अण्णा द्रमुक पक्षाला काही लोकांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पक्षाला त्यांच्यापासून सोडवण्यासाठी आपण नवा पक्ष स्थापन केल्याचे त्यांनी म्हटले होते.