नो एन्ट्री मोदी; तामिळनाडूमध्ये झळकले बॅनर !

0

चेन्नई: चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे आज शुक्रवारपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व क्षी जिनपिंग यांच्यात चर्चा होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी आज चेन्नईला जाणार आहेत. मात्र मोदींच्या या दौऱ्याला तामिळनाडूमधील नागरिकांनी विरोध केला आहे. ठिकठिकाणी मोदींना विरोध म्हणून बॅनर लागलेले आहे, मात्र तामिळनाडूतील नागरिकांनी जिनपिंग यांचे स्वागत केले आहे.

GoBackModi हा हॅशटॅग ट्विटवर सकाळपासूनच टॉप ट्रेण्ड होताना दिसत आहे. मोदी आणि जिनपिंग मामल्लापुरमला जाण्यासाठी रवाना होण्याआधीच सोशल नेटवर्किंगवरुन मोदींना विरोध होताना दिसत आहे. #TNwelcomesXiJinping हा हॅशटॅग वापरुन तामिळनाडू जिनपिंग यांच्या स्वागतासाठी तयार असल्याचे अनेकांनी ट्विटवर म्हटले आहे.

केवळ भारतातच नाही तर चीनमधूनही मोदींच्या तामिळनाडू भेटीला विरोध होताना दिसत आहे. चीनमध्येही हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसला. चीनमधील नेटकऱ्यांनी मोदी परत जा या अर्थाचा #回到莫迪 (Huí dào mò dí) हा हॅशटॅग वापरुन मोदींना विरोध करणारे ट्विट केले आहेत. काही तासांमध्ये या हॅशटॅगवर ५३ हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. पाहुयात काही व्हायरल झालेले ट्विट