मुंबई-तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या गाण्याच्या शूटवेळी नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले, असा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. या आरोपानंतर नाना पाटेकर यांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवत, आपल्या आरोपांबद्दल माफी मागण्याची मागणी केली आहे. दरम्यान आता या वादात अभिनेत्री राखी सावंत हिने उडी घेतली आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटींगवेळी तनुश्री दत्ता ड्रग्ज घेऊन बेशुद्ध पडली होती आणि म्हणून ती गाण्याचे शूट करू शकली नव्हती असे राखी सावंतने सांगितले आहे.
तनुश्री ड्रग्स घेऊन बेशुद्ध झाल्याने गाणे शूट करण्यास राखीची वर्णी लागली होती. त्यामुळे या संपूर्ण घटनेसंदर्भात राखीने विस्ताराने सांगितले आहे.