टीसीएलचा स्मार्ट टीव्ही ब्रँड ‘आयफाल्कन’ दाखल

0

मुंबई- १ मे २०१८: जगातील सर्वोच्च तीन टीव्ही उत्पादकांपैकी एक टीसीएल मल्टीमीडियाने भारतीय बाजारात स्मार्ट टीव्ही ब्रँड ‘आयफाल्कन’ सादर केला आहे. कंपनीने अँड्रॉइड ७.० नुगाट द्वारा संचालित स्मार्ट टीव्ही आयफाल्कन ५५के२ए आणि आयफाल्कन एफ २ यावेळी सादर केले. कंपनीने टीव्ही विक्रीकरिता फ्लिपकार्टसह हातमिळवणी केली असून टीव्हीची पूर्व नोंदणी सुरु झाली आहे. आयफाल्कन ५५के२एची किंमत ४५,९९९ रुपये तर आयफाल्कन एफ२ची किंमत १९,९९९ रुपये आहे.

आयफाल्कनची उच्च गुणवत्तावाली उत्पादने नव तंत्रज्ञानाने युक्त आहेत. ५ जी, अधिकतम डेटा, टीसीएलद्वारा निर्मित कृत्रिम बुद्धिमत्ता आयफाल्कनला वापरकर्त्यांची वैयक्तिकृत सामग्रीपर्यंत थेट पोहोच प्रदान कारण्यासाठी सक्षम बनविते. रिलायन्स जिओ, नेटफ्लिक्स, गुगल प्ले मुव्हीज आणि टीव्ही, युट्युब आणि इरॉस नाऊ, यप्प टीव्ही फ्लीक्री यांसारख्या प्रमुख सामग्री प्रदात्यांसोबत असलेल्या मजबूत भागीदारीच्या बळावर आयफाल्कन ग्राहकांना मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करतो.’

टीसीएल मल्टीमीडिया ओव्हरसीज बिझनेस सेंटरचे महाव्यवस्थापक हॅरी वू यांनी सांगितले की, ‘टीसीएलचा कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक डोमेनमध्ये त्यांच्या नेतृत्वाची स्थिती अधिक बळकट करण्यावर विशेष भर आहे. आमचे दीर्घकालीन लक्ष्य भारतीय युवकांना मनोरंजनाचे नवीनतम तंत्रज्ञान उपलध करून देण्यासह स्मार्ट उत्पादनांकरिता प्रसिद्ध ब्रँड बनण्याचे आहे. आयफाल्कन ब्रँडचे लॉन्च हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला सहायक ठरेल.’

टीसीएलचे उद्दिष्ट देशभरातील दर्शकांना ऑनलाईन असो वा ऑफलाईन त्यांचे आवडते मनोरंजन सहज उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या घरगुती मनोरंजनाचा अनुभव सुधारण्याचे आहे. उच्च गुणवत्तायुक्त सामग्री, स्मार्ट तंत्रज्ञान आणि शक्तिशाली हार्डवेअरसह आयफाल्कन आपल्या वापरकर्त्यांना उत्तम ऑडिओ आणि व्हिजुअल अनुभवाद्वारे सर्वात परिपूर्ण आणि समृद्ध मनोरंजन अनुभव प्रदान करेल.