चहा विक्रेत्याचा मुलगा बनला ‘आयएएस’

0

जैसलमेर – वडिलांचा चहा विक्रीचा व्यवसाय. घरची आर्थिक परिस्थिती बेताची, असा परिस्थितीत मुलाला उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न पित्याने पाहिले. शिक्षणासाठी आपली परिस्थिती आडवी येवू नये म्हणून त्यांनी व्याजाने पैसे घेतले. वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे लेकाने देखील चीज केले. अभिमान वाटेल अशी कामगिरी करत यूपीएससीच्या परीक्षेत देशात ८२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

जैसलमरचा रहिवाशी असलेला देशलदानची ही गौरवगाथा. त्याच्या यथानंतर गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्वत्र आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. स्वर्णनगरीच्या चुंगी नाक्यावर देशदलानच्या वडिलांची चहाची टपरी आहे. देशदलान लहानपणापासून अभ्यासात गती होती. त्याची शिकण्याची जिद्द शिक्षकांनी हेरली होती. त्याला शाळेतून प्रोत्साहन मिळायचे.

वडिलांची प्रत्येक टप्प्यावर साथ मिळत गेली आणि अथक परिश्रमांच्या जोरावर त्याने यूपीएससीचा खडतर प्रवास लीलया पार केला. आपला पोर आयएएस झाल्याची बातमी धडकताच वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.