सुनसगाव येथील दामु पांडू पाटील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक गणेश भास्कर पाटील यांना, शिक्षक गौरव पुरस्कार.
सामाजिक कार्यात सक्रिय असलेले सुहास
गोपाळराव चौधरी यांना समाज भूषण पुरस्कार.
प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन भुसावळ
येथे स्थिर होऊन. रोटरी क्लबचे अध्यक्ष तसेच
विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे
व शासकीय योजनांचे प्रबोधन करणारे राजेंद्र
कुमार भानुदास फेगडे यांना लेवारत्न पुरस्कार.
अध्यात्मिक कार्यात 35 वर्षाच्या प्रदीर्घ काळापासून सेवा देणारे हनुमान नगरातील
ज्येष्ठ नागरिक रामचंद्र पांडुरंग ढाके सेवा रत्न
पुरस्कार. विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सेवा
असणाऱ्या सौ.शैला रविंद्र चौधरी यांना उत्कृष्ट
सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार.
सदरचे पुरस्कार हे प्रतिनिधिक स्वरूपाचे असून
सन्मान पत्र, शाल,हार, शिरोभुषण, श्रीफळ व
स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रौप्य महोत्सवी सन्मान सोहळ्यात सदर पुरस्कार
प्रेरणा म्हणून सन्मान पूर्वक प्रदान करण्यात’
येणार आहे.
आज ” साने गुरूजी स्मृतीदिना निमित्ताने”
साने गुरूजींच्या साहित्याचे(पुस्तकांचे) प्रदर्शन वाचनालयात सर्वांसाठी खुले राहील, तरी यांचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.