भुसावळ प्रतिनिधी दि 5
नगरपरिषद भुसावळ संचलित मुनिसिपल स्कूल येथे शिक्षक दिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ललित फिरके होते, प्रमुख पाहुणे पालक शिक्षक संघाचे श्री अब्दुल हमीद शेख बाबू, भारती मतलाने ज्येष्ठ शिक्षिका मालती भिरूड. हे होते. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस मल्यारपण करण्यात आले. तर नंतर शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मालती भिरूड (पाटील) यांचे पती प. क. कोटीच्या विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे. एच. पाटील. यांच्यातर्फे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना नॅपकिन, श्रीफळ व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वाती सोनवणे, हिने शिक्षक दिनाचे भाषण केले. व नंतर दिवसभर केशरसिंग, लकी सोनवणे, स्वाती सोनवणे, डिंपल अडागळे, सनी सोनवणे विद्यार्थ्यानी शिक्षकाची भूमिका बजावून शिक्षकाचे कार्य केले. सूत्रसंचालन नाना पाटील यांनी केले.