शिक्षण प्रसारक मंडळाची प्राथमिक शाळा न्हावी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.

न्हावी प्रतिनिधी

दि 5 शिक्षण प्रसारक मंडळाची प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक .डी .एच .तळेले होते. त्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डी . एच.तळेले यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शनकेले तसेच शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना त्यांनी पेन दिले व ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग अध्यापनाचे कार्य केले त्यांना त्यांनी पेन दिले.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त वर्ग अध्यापनाचे कार्य सुंदर रीतीने पार पाडले. अनेक मुलांनी सुंदर वेशभूषेत व सुंदर भाषा शैली विद्यार्थ्यांना वर्ग अध्यापन केले. इयत्ता चौथी चा विद्यार्थी दिव्य झोपे यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची वेशभूषा सादर करून आपले उत्तम वकृत्व सादर केले. शिक्षक दिनानिमित्त अनेक मुलांनी आपापल्या वर्गात वर्ग अध्यापनाचे कार्य सांभाळले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप घुले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन बशीर तडवी यांनी केले त्यावेळेस वंदना चौधरी, वैभव फिरके, हिरकणी पाटील ,प्रवीण चव्हाण ,गोकुळ इंगळे उपस्थित होते