गुरूग्राम: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आज सहाव्या टप्प्यातील मतदानासाठी हरियाणातील गुरुग्राम येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदान यादीत नाव नसल्याने विराट कोहली यावर्षी मतदान करणार नाही असे बोलले जात होते. मात्र विराटला मुंबईत मतदान करायचे होते, मुंबईच्या मतदार यादीत नाव सामील न झाल्याने त्याने गुरूग्राम येथे मतदान केले. विराटची पत्नी अनुष्का शर्मा सोबत मुंबईत मतदान करण्याची इच्छा होती. मतदारांच्या रांगेत उभे राहून विराटने मतदान केले.