बंगळूर संघाने मोहम्मद सिराजच्या घरी जेवणावर मारला ताव

0

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबाद विरोधातील ‘करो या मरो’च्या लढतीसाठी बंगळुरु संघ हैदराबादमध्ये होता. रविवारी प्रॅक्टिसनंतर पार्थिव पटेल, यजुवेंद्र चहल आणि विराट कोहली टोलीचौकी भागातील सिराजच्या घरी दाखल झाले. यावेळी त्यांनी हैदराबादी बिर्याणी, पथ्थर का गोश्त, कोर्मा, खुबानी का मेर्था आणि डबल का मीठा यासारख्या चविष्ट पदार्थांवर ताव मारला.

सिराजने ट्विटर, इन्स्टाग्रामवरुन विराट कोहलीचे आभार व्यक्त केले आहेत. त्याच्यासोबत काही फोटो आणि व्हिडिओही त्याने पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये सिराज विराट कोहलीला मिठी मारत आहे. कोहली सिराच्या घरी आल्याने खूप आनंदी होता. ‘धन्यवाद वीके भैया. हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गिफ्ट आहे.’ अशा भावना गहिवरलेल्या सिराजने फोटो शेअर करताना व्यक्त केल्या आहेत.