नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने आजच्या १२ वर्षापूर्वी क्रिकेट जगतात नवा इतिहास कोरला होता. टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकून भारतीय संघाने इतिहास घडविला. कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली २००७ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला नमवून टी-२० विश्वचषक स्पर्धा आपल्या नावावर केले होते. बीसीसीआयने आज एक व्हिडीओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
टी-२० चा अंतिम सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरोद्ध झाला. यात शेवटच्या षटकात पाकला ४ चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना पाकिस्तानचा शेवटचा फलंदाज बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाने आनंदोत्सव साजरा केला.