आपण सर्व ऑनलाईन प्रोडक्ट्स घेतांना त्यांचे रिव्ह्यू पाहून घेतो. परंतु ‘Which?‘ ने केलेल्या सर्व्हेनुसार अमेझॉनवरील अनेक टेक प्रोडक्ट्सचे रिव्ह्यू फेक असल्यास समोर आले आहे. यामुळे अमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अनेकदा ज्या कंपनीचे नाव देखील कोणी ऐकलेले नसते असे अनेक प्रोडक्ट्स अपलोड केल्याच्या काही तासातच शेकडोच्यावर ५ स्टार फेक रिव्ह्यू येतात. यात १४ प्रोडक्ट कॅटेगरीचा अभ्यास केल्यावर स्मार्टफोन, हेडफोन, स्मार्टवॉच, कॅमेरा यावर सर्वात जास्त फेक रिव्ह्यू असतात.