तेज प्रताप यादवांच्या बॉडीगार्डकडून छायाचित्रकाराला मारहाण !

0

पटना: आज लोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेले आहे. दरम्यान लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव हे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्या बॉडीगार्डकडून छायाचित्रकाराला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

दरम्यान तेज प्रताप यादव यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. माझ्या बॉडीगार्डकडून छायाचित्रकारांना मारहाण झालेली नसून छायाचित्रकारांनी माझ्या वाहनाची तोडफोड केल्याचे म्हटले आहे.