तेजस एक्स्प्रेसच्या धडकेत रेल्वेतील तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू !

0

पेण-तेजस एक्स्प्रेसची धडक लागून रेल्वेतील तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पेण रेल्वे स्थानकावळील जिते गावाच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. रविवारी रात्री हा अपघात झाला.

अशोक बारे (३०), मानसिंग गुलकर (४०) आणि अजय दांडोदिया (१८) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही रविवारी रात्री रेल्वे रुळ ओलांडत असताना तेजस एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. तिघेही रेल्वेचे कंत्राटी कामगार होते.