साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता जयप्रकाश रेड्डीचे निधन

0

गुंटूर: साऊथ सिने इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे आज मंगळवारी हृद्य विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. आंध्रप्रदेशच्या गुंटूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेलुगु सिनेमाचे प्रेक्षक जयप्रकाश रेड्डी यांना कॉमेडी एक्टर म्हणून ओळखत असे. त्यांनी ब्रम्हपुत्रुदू या सिनेमापासून करिअरला सुरुवात केले होते.

जयप्रकाश रेड्डी यांच्या निधनाने टॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनीही त्यांच्या निधानाने शोक व्यक्त केला आहे.

१९८० पासून त्यांनी अनेक सिनेमात काम केले होते. अलीकडे साऊथचे सिनेमे हिंदीमध्ये डब करुन दाखवले जातात. यात जयप्रकाश रेड्डी यांची भूमिका हमखास प्रेक्षकांना पाहायला मिळत असते.