तेलगु देसमच्या खासदाराच्या घर आणि कार्यालयावर ‘रेड’

0

हैदराबाद: आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंध्रप्रदेशामधील तेलगू देसमचे खासदार सीएम रमेश यांच्या निवासस्थानावर व कार्यालयावर छापेमारी केली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील पोतलादुर्ती येथे एकाच वेळी छापेमारी केली.

खासदार सी.एम.रमेश हे तेलगु देसम पार्टीचे राज्यसभा सदस्य आहेत. आयकर विभागाने छापेमारी केली तेंव्हा ते दिल्लीत होते. खासदार सी.एम.रमेश हे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांचे निकटवर्तीय मानले जातात. 5 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशातीलच तेलगू देसमचे नेते आणि उद्योगपती बीडा मसथन राव यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती.