शहादा तालुक्यात भीषण अपघात ; 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

शिरपूर- शहादा रस्त्यावर तऱ्हाडी जवळ दुचाकी खड्ड्यात पडल्याने झालेल्या अपघातात भटाणे येथील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झल्याची घटना बुधवारी रात्री घडली.तुषार हेमंत पाटील रा.भटाणे असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वार्डबॉय च्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

शिरपूर तालुक्यातील भटाणे येथील रहिवासी असलेल्या तुषार हेमंत पाटील हे शहादा येथे आयटीआयचे शिक्षण घेत असून बुधवारी सायंकाळी शहादा येथून भटाने येथे येत असतांना शहादा रस्त्यावर हिंगणी ते तऱ्हाडी दरम्यान रस्त्यावरील खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात असतांना रस्त्यातील खड्ड्यात पडल्याने दुचाकी घसरली त्यात तुषार पाटील गंभीर जखमी झाले त्यास जखमी अवस्थेत शहरातील इंदिरा मेमोरियल मध्ये उपचारासाठी दाखल केले.जखमी अत्यवस्थ असल्याने त्यास धुळे येथे अधिक उपचारासाठी घेऊन जात असतांना नरडाणा गावाजवळ मयत झाले त्यास मयत स्थितीत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ जैन यांनी मयत घोषित केले.याप्रकरणी वार्डबॉयच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ चौधरी करीत आहेत.