नाटीपारा: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पीडीपी नेता हाजी परवेज अहमद यांच्या घरावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पीडीपी नेत्याच्या खासगी सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. श्रीनगर जिल्ह्यातील नाटीपोरा भागात आज सोमवार १४ रोजी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. खासगी सुरक्षा रक्षकाचे मंजूर अहमद असे नाव आहे. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
काल जम्मू-काश्मीरमधील पूंछमधील दुर्गन पोशाणा भागात झालेल्या चकमकीत, दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. याशिवाय दहशतवाद्यांच्या एका सहकाऱ्यास अटकही करण्यात आली आहे.