घुसखोरीच्या प्रयत्नात असणारा एक दहशतवादी ठार

0

नवी दिल्ली – भारतीय जवानांनी पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी उधळून लावत एका दहशतवादाला कंठस्नान घातले आहे. पुंछच्या सलोतरी गावाजवळ पाकिस्तानमधून काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. ४ ते ५ दहशतवादी एलओसीमधून घुसखोरीचा प्रयत्न करत होते. भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी ठार तर एक जखमी झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. श्रीनगरमधील नौहट्टा, रेनवाडी, खानयार, एम.आर.गंज, सफा कदाल, क्रालखड आणि मैसूमा या भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. भारतीय लष्कराकडून सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.