दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त

0

नवी दिल्ली-जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात सुरक्षा रक्षकांनी मोठी कारवाई करीत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले आहे. या कारवाईदरम्यान जवानांनी ४ दहशतवाद्यांसह त्यांना मदत करणाऱ्या ६ स्थानिक सदस्य़ांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी नदीम हा स्वतःची ओसामा अशी ओळख सांगत होता, तोच हे मॉड्युल चालवत होता.

ताब्यात घेण्यात आलेल्या चारही दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी तीन नागरिकांची हत्या केली होती. त्यामुळे ते पोलिसांच्या रडारवर होते. त्याचबरोबर या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ६ स्थानिक लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारवाईदरम्यान, पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्यारे जप्त केली आहेत की, ते एखादे युद्ध छेडण्याच्या तयारीत असल्याचे चित्र होते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.