ज्याच्या गाडीने पुलवामा हल्ला झाला, त्या सज्जाद भट्टचा खात्मा !

0

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने आज मंगळवारी जैश ए मोहम्मदचा कमांडर सज्जाद भट्टला ठार केले आहे. अनंतनागमध्ये सज्जाद भट्ट यांच्यासोबत आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. याच सज्जाद भट्टच्या गाडीचा वापर करून १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता.

याशिवाय पुलवामा आयईडी स्फोटाच्या मास्टरमाईंडलाही ठार करण्यात आलंय. हा दहशतवादी १७ जून रोजी पुलवामामध्ये सेनेच्या गाडीवर झालेल्या आयईडी स्फोटाचा मास्टरमाईंड होता. सध्या, सुरक्षादलाकडून पुलवामा आणि अनंतनागमध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.