कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कोहलीने गमावले; स्मिथची झेप !

0

नवी दिल्ली: विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. परंतु विराट कोहलीला काहीसा धक्का बसला आहे. भारताकडून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोहलीने आपल्या नावावर केला आहे. पण आयसीसीच्या क्रिकेट क्रमवारीत कोहलीच्या अव्वल स्थानात घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथने कसोटी क्रमवारीत कोहलीला एका गुणांनी मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीमध्ये हा ९०३ गुणांसह अव्वल स्थानी होता. पण अॅशेश कसोटी मालिकेत दमदार कामगिरीच्या जोरावर स्मिथने ९०४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.