विद्यार्थ्यांवर बेछूट गोळीबार; १० जण ठार

0

टेक्सास :- अमेरिकेतील टेक्सामधील एका हायस्कूलमध्ये एका बंदूकधारी विद्यार्थ्याने केलेल्या बेछूट गोळीबारात १० जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. हि घटना ह्यूस्टनपासून जवळपास ५० किमी अंतरावरील सांता फे हायस्कूलमध्ये घडली आहे. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश शाळकरी मुलांचा समावेश आहे. स्थानिक पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी शाळेच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. त्याचबरोबर मुलांना इतर सुरक्षास्थळी हालवण्यात येणार असल्याचे संबंधीत शाळा प्रशासनाने म्हटले आहे. शाळेचे मुख्याध्यापक क्रिस रिचर्डसन यांनी सांगितले की, विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गेल्या ७ दिवसात शाळेत गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. तर, वर्षभरातील ही २२ वी घटना आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेसंदर्भात ट्वीट करत चिंता व्यक्त केली आहे.