ठाण्यातील रिक्षा आणि टॅक्सी संपाला संमिश्र प्रतिसाद

0

ठाणे – ठाण्यात आयुक्तांनी केलेल्या कारवाईविरोधात रिक्षा संघटनांनी रिक्षा आणि टॅक्सी फुट पडली आहे. शिवसेना आणि भाजपप्रणीत रिक्षा संघटना या संपात सहभागी झाल्या नसल्याने संपाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकाला केलेल्या कथित मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून ठाण्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांसह फेरीवाल्यांनी आज एक दिवसाचा संप पुकारला आहे. आयुक्तांसह पालिकेचे अन्य अधिकारी, बाउन्सरवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागी ऑटो-टॅक्सी संघर्ष कृती समितीने केली होती.

संपाच्या पार्श्वभूमीवर टीएमटी प्रशासन अधिकाधिक बसेस रस्त्यावर उतरवणार असल्याचे जाहीर केले असले तरी सकाळी कामावर जाणार्‍यांचे चांगलेच हाल होताना दिसून आले.