आमदार चंद्रकांत पाटील यांचे मुळे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना दिलासा, फॉर्म भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ

मुक्ताईनगर प्रतिनिधी | आज डिप्लोमा ( तंत्रनिकेतन) प्रवेशासाठी शेवटचा दिवस असतांना देखील सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. याची दखल घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून माहिती देत यासाठी मुदतवाढ मिळवली. यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघासह राज्यातील तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, सध्या डिप्लोमा अर्थात पदवीका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून याचा 21 जून रोजी शेवटचा दिवस होता. गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारचे दाखल मिळण्यात विद्यार्थ्यांना खूप अडचणी येत आहेत. प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे यामध्ये नॅशनॅलिटी सर्टिफिकेट अधिवास दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमीलेअर ही प्रमाणपत्रे अथवा दाखले महसूल विभागाचे सर्वर डाऊन असल्याने मिळत नसल्याने यातच सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थी आणि पालक त्रस्त झालेले आहेत. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागणार असल्याचा धोका होता. ही व्यथा विद्यार्थी आणि पालकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना सांगितली.

 

या अनुषंगाने आमदार पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना भ्रमणधणीवरून या समस्यांबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत वाढवून मिळावी अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी केलेल्या मागणीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार असल्याची सांगितले . आता ही मुदत 30 जून पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. अर्थात, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.