असे असणार वर्ल्डकपचे सामने

0

मुंबई : २०१९ इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या वर्ल्डकपच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.  वर्ल्डकपची सुरुवात 30 मे पासून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्यापासून होणार आहे.   वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिके विरुद्ध होईल. तर १६  जूनला भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमध्ये महासामना पाहायला मिळणार आहे. जेव्हा ही दोन्ही संघ एकमेकांच्या समोर असतात तेव्हा सामन्यामध्ये एक वेगळा रोमांच पाहायला मिळतो.

वर्ल्डकपसाठी भारतीय टीमची घोषणा झाली नसली तरी १६  जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी  रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, महेंद्र सिंह धोनी(विकेटकीपर), केदार जाधव, हार्दिक पंड्या, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आदीं संभाव्य खेळाडूंची यादी आहे.