कॉंगेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आस

0

नवी दिल्ली: २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहे. उद्या दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. दिल्लीच्या गादीवर बसण्यासाठी सगळे पक्ष आसुसलेले आहे. त्यात प्रादेशिक पक्षाना महत्व आले असून उद्याच्या निकालानंतर प्रादेशिक पक्ष आपली भूमिका स्पष्ट करतील. एक्झिट पोलच्या निकालावर प्रादेशिक पक्षानी आपले पत्ते अजून ओपण केलेले नाही. त्यात कॉंग्रेसला २००४ प्रमाणे आपण पुनरागमन करू असा विश्वास आहे.

२००४ साली कॉंग्रेसला १४५ जागा मिळाल्या होत्या. प्रादेशिक पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. २०१९च्या निवडणुकीत आपण पुनरागमन करू असा विश्वास असून, कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक संदेश दिला आहे. त्यामध्ये त्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी खचून न जाता निकालाच्या दिवशी दिवसभर मतमोजणीच्या ठिकाणी थांबण्याचे सांगितले आहे. आपण घेतलेल्या मेहनतीला नक्कीच फळ मिळेल असा कॉंग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास आहे.

काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेत १४० च्या जवळपास जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भाजपाला १८० जागा मिळू शकतात. एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळेळ असा दावा करण्यात आला आहे. तो दावा सगळ्या पक्षांनी फेटाळला आहे.