रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आधार आवश्यक

0

नवी दिल्ली-आयआरसीटीसी संकेतस्थळाद्वारे रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी आता लवकरच आधार कार्ड सक्तीचे करण्यात येण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट आरक्षणामधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आला असून त्याच्यावर विचार सुरू आहे.

रेल्वे सुरक्षा दलाने मुंबईत ३ मे रोजी सॉफ्टवेअरच्या माध्यमाने ऑनलाइन तिकिटांमध्ये फेरफार करणाऱ्या एजंटला अटक केली होती. त्यावेळी आरोपीची चौकशी करण्यासाठी आणि कार्यपद्धती जाणून घेण्यात आली. आरोपीची कार्यपद्धती समजून घेऊन तयार केलेला प्रस्ताव त्यांनी रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. त्यामध्ये आधार लिंक करण्याच्या सूचनेचाही प्रस्ताव आहे.

व्यावसायिक आयपी अ‍ॅड्रेस असल्यास त्याची नोंद आयआरसीटीसीकडे करण्यात यावी, यानंतर संबंधित व्यावसायिक आयपी अ‍ॅड्रेसला अनेक तिकिटे आरक्षित करण्याची मुभा मिळेल, अशी सूचना करण्यात आली आहे. तसंच, तिकीट आरक्षित करताना ‘कॅप’ अधिक सुरक्षित करण्याच्या सूचनादेखील प्रस्तावित आहे.